Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“महिलांनी राजमाता तर युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा” – सुभाष जाधव

पारोळा प्रतिनिधी | “राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले तर गुरुंच्या संस्कारांमुळे नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. महिलानी राजमाता जिजाऊ तर युवकानी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा.” असे प्रतिपादन वसंतनगर ता.पारोळा येथील वसंतराव ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष व गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी केले.

पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंतीचा कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष जाधव हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे या महाराष्ट्राच्या भूमीत महान राजा जन्माला आले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्यामुळे जगात आपल्या देशाची आगळी-वेगळी ओळख निर्माण झाली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे चरित्र युवकाना नेहमीचं प्रेरणा देत राहील ”

यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक सोपान पाटील, माध्यमिक शाळेचे मुख्याद्यापक सी के पोतदार, उपशिक्षक एस जे भामरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी इयत्ता बारावीची विद्यार्थिनी सोनाली पाटील हीने ‘राजमाता जिजाऊ’ यांची वेशभूषा साकारली होती. प्रा.हिरालाल पाटील, प्रा.एन एस चव्हाण, प्रा.विजय बेहरे, प्रा.तिरुपतीकुमार वारुले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस के देवरे तर आभार प्रदर्शन एम एन कुंवर यांनी केले.

Exit mobile version