Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जल्लोष (व्हिडीओ)

बुलढाणा प्रतिनिधी । आज राजमाता जिजाऊ यांची ४२४ व्या जन्मोत्सवानिमित्त राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. पहा लाईव्ह ट्रेंड न्युजचा विशेष रिपोर्ट….

तसेच यावेळी शासकीय पूजा देखील करण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असून ‘जय जिजाऊ, ‘जय जिजाऊ’ च्या घोषणाने परिसर दणाणले होता.

दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ह्यावर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय. मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसतार ह्यावर्षी फक्त  50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांची ह्यावर्षी गर्दी याठिकाणी पहायला मिळणार नाही. मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टी वर विद्युत रोषणाई केलेली आहे. शिवाय घरीच राहून जिजाऊ याना मानवंदना करावी , असे आवाहन पालकमंत्री शिंगणे यांनी केले आहे.

 

Exit mobile version