Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प.वि.पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

सर्वप्रथम शाळेच्या मुख्या. रेखा पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या भूमिका साकारून त्यांच्या जीवन कार्याचा उजाळा दिला .काहींनी  भाषणे केली तर काहींनी सुंदर ओव्या सादर केल्या ,तर काहींनी नाटक सादर केले. शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवले तर विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची माहिती करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील , अशोक चौधरी , कायनात यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version