Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

एरंडोल प्रतिनिधी | एरंडोल येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय केंद्राच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी मैत्री फाउंडेशन, प्रबोधिनी क्रीडा संकुल, कबड्डी,कुस्ती, फुटबॉल, स्केटिंग आदी. विविध क्रीडा क्षेत्रातील युवकांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, सविता दीदी, इंगळे सर, पवार उद्योग समुहाचे वसंत पवार, निवृत्त तहसिलदार अरुण माळी, कृष्णा हॉटेलचे संचालक कृष्णा धनगर यासह महिला व तरुण यांची उपस्थिती होती.

Exit mobile version