Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजीव गांधी सानुग्रह अनुदान भोसले यांच्या हस्ते वाटप

जळगाव प्रतिनिधी । राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आलेले जवळपास २२ विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यृ झाला होता. दरम्यान, वेळोवेळी पाठपुरावा करून २२ विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना एकूण १५ लाख ७५ हजार रूपयांचे अनुदानाचा धनादेश वाटप महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांच्या हस्ते सदरील कुटूंबास वाटप करण्यात आला.

तथापि, यामध्ये पाण्यात बुडून, सर्पदंशाने, तसेच अपघाताने झालेल्या विद्यार्थांचा समावेश होता. जिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील जिल्हाभरातून आलेले जवळपास 21प्रलंबित प्रस्ताव होते. तरी संबंधित लाभार्थी जिल्हा परिषद शिक्षण विभागात खेटे मारत होते हे चिञ पहावयास मिळत होते पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५०ते ७५ हजार रूपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत जवळपास २1 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या  बैठकीत २1 प्रकरणे निकाली काढून त्या लाभार्थी यांना आज धनादेश वाटप दिव्या भोसले यांनी केला.

 

Exit mobile version