Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजेश वानखेडे यांची कृषि विद्यापीठात कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती

WhatsApp Image 2019 12 25 at 7.54.28 PM

सावदा, प्रतिनिधी | येथील राजेश गजानन वानखेडे यांना कोकण कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे.

राजेश गजानन वानखेडे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे प्रगतीशील शेतकरी या ओबीसी प्रवर्गातून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची त्यांची तीन वर्षासाठी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील माणिकनगर येथील अर्चना दत्तात्रय पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version