Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका माजी सेवारत अर्धसैनिक कल्याण असोशिएसनच्या अध्यक्षपदी राजेश जगताप

यावल प्रतिनिधी । तालुका माजी सेवारत अर्धसैनिक कल्याण एसोशियशनचे अध्यक्षपदी दहिगाव येथील माजी सैनिक राजेश जगताप तर उपाध्यक्षपदी सौखेडा सिम येथील माजी सैनिक अय्युब तडवी यांची निवड करण्यात आली आहे.

अर्धसैनिक सेवानिवृत/सेवारत सैनिक यांचे सुविधा व न्याय मिडवुन देने करिता दिल्ली येथील  कोणफेडरेशन ऑफ एक्स पैरामिलेट्री फोर्स वेलफेयर एसोसिएशन व जलगांव जिला एसोशियशन यांचे कडून यावल तालुका सेवानिवृत/सेवारत अर्द्ध सैनिक यांचे समस्याचे निवारण करीता यावल तालुका अर्धसैनिक कल्याण एसोशियशनचे अध्यक्ष पदी दहिगांव तालुका यावलचे माजी सैनिक राजेश जगताप याची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पदी माजी सैनिक अय्यूब तडवी, सौखेडा तर सचिवपदी माजी सैनिक मोहन येऊल यावल व उपसचिवपदी माजी सैनिक सुनील कदम यावल, तर कॉर्डिनेटरपदी यावलचे माजी सैनिक राजेश बारी याची निवड झाली आहे.

दहीगांवचे माजी सैनिक राजेंद्र जगताप व सौखेडा चे माजी सैनिक अय्यूब तडवी याची ही निवड झालेने दहीगांव, सौखेडा, कोरपावली येथील सारे नागरिक यांनी शुभेच्या दिल्या आहे. सोबतच परिसरतिल माजी सैनिक-सैनिक यांनीही शूभेच्छा दिल्या आहेत. यात विरावलीचे माजी सैनिक मुकेश पाटिल, सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल, प्रदीप अड़कमोल, अमोल अड़कमोल, प्रशांत अड़कमोल, संकेत अड़कमोल व दहीगांव येथिल सैनिक चंद्रकांत साळूके, तुषार सरोदे व मोहन अशोक चौधरी तसेच कोरपावलीचे माजी सैनिक महेंद्र पाटिल व उज्ज्वल महाजन यानी कार्यकारणीचे स्वागत केल  आहे.

Exit mobile version