Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज नाही

मुबई (वृत्तसेवा) नोकऱ्यांमध्ये राज्यातल्या मुला मुलींना प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही असं राज ठाकरेंनी मत व्यक्त केलं आहे. राज्यातल्या तरूणांची राज्य सरकारने फसवणूक केली असून आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केली आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवलं आहे. राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
दुष्काळावरूनही राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली आहे. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला असे प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जाते असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता असं मोदींनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जाते आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Exit mobile version