Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अडीच तासापासून राज ठाकरे यांची चौकशी सुरु

raj thakre

मुंबई (वृत्तसंस्था) कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीच्या कार्यालयात मागील  अडीच तासापासून बंद दरवाज्याआड चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी राज ठाकरे यांची चौकशी करत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून ईडीचे अधिकारी राज ठाकरेंना मागील अडीच तासापासून प्रश्न विचारत आहेत. हा सगळा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मनसेसह सर्वच भाजपाविरोधी पक्षांकडून होत असला तरी, मनसैनिकांच्या मनात एक धाकधुक नक्कीच आहे.

Exit mobile version