आत्मचिंतन करण्याची राज ठाकरेंना खरी गरज – जयंत पाटील

मुंबई /सांगली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज ठाकरे एक चांगले नकलाकार असून ते इतरांच्या चांगल्या करतात आणि ते पाहण्यासाठीच राज ठाकरेच्या सभांना लोक गर्दी करतात.  त्यामुळे राज ठाकरेंना लोक गांभीर्याने घेत नसल्याने त्यांना खरी आत्मचिंतनाची गरज आहे, असा मार्मिक टोला जयंत पाटील यांनी सांगली येथे झालेल्या जाहीर सभेत लगावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत भोंगे खाली उतरवा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सभेत केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगाबाद येथे जाहीर सभेत अल्टीमेटम देत कार्यकर्त्यांना मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याची सूचना केली. त्यावरून देखील त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

राज ठाकरे आतापर्यंत अनेक भूमिका बदलवत आले, आणि त्यासाठी त्यांची करणे पण वेगवेगळी असतात. ते भूमिका बदलतात हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना आत्मचिंतन करावे असे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला,

१० मे रोजी झालेल्या भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला सोबत घेतले. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या त्यातल्या कोणाचेच पालन काँग्रेसने केले नाही, त्यामुळे जे घडले यावर नाना पटोलेनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला. पटोले यांच्या या आरोपानंतर मी जिल्ह्याच्या तपशील घेतला. त्यातून जे समोर आले ते असे, २०१० च्या निवडणुकीत काँग्रेसचे १४ सदस्य होते त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला टाळून भाजपाबरोबर युती केली. २०१५ मध्ये सुद्धा अग्रवालाच्या मदतीने राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. याचा सर्व लेखाजोखा वरिष्ठ पातळीवर मांडला पण काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी नाना पटोलेंनी केलेल्या आरोपावर केली.

Protected Content