Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरे चौकशीला गेले की सहकुटुंब सत्यनारायणाच्या पूजेला ?- दमानिया

damaniya

मुंबई, वृत्तसंस्था | कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीला सामोरे जाण्यासाठी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाकडे सहकुटुंब रवाना झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला ?, असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

 

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार इ.डी.च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला ? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण, सगळे मिळून माहिती देणार का ? काय हा ड्रामा, का सहनुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे ? ठाकरे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर ट्विटद्वारे दमानिया यांनी हा प्रश्न विचारला आहे. राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब असे सगळे मिळून ईडीला माहिती देणार का ? असा प्रश्नही दमानिया यांनी विचारला आहे.

Exit mobile version