Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज मुंबईत होणार ‘राज-गर्जना’ ; मनसेच्या दोन सभा

Raj Thackeray

मुंबई प्रतिनिधी । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त हुकला. राजगर्जनेपूर्वी पुण्यात मेघगर्जना झाल्याने सभास्थळ पाण्याने भरले. परिणामी मनसेला पहिली सभा पावसामुळे रद्द करावी लागली. त्यामुळे ठाकरेंची विधानसभा निवडणुकीची पुढील दोन सभा आज मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात होणारी पहिली प्रचार सभा पावसामुळे रद्द करावी लागली आहे. ईडीच्या चौकशीनंतर मनसेचे अध्यक्ष काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले होते. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग पुण्यातून फुकणार होते. काल झालेल्या पावसामुळे पाऊस सभा रद्द होऊ नये म्हणून मैदान सुकवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले मात्र आज पुन्हा मुसळधार झालेल्या पावसामुळे अखेर सभा रद्द करावी लागली. राज ठाकरे पुण्यातील आपल्या पहिल्या सभेतून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार होते. मात्र काल झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल जमा झाला होता. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्याच सभेत ते कोणाचा समाचार घेणार याची उत्सुक्ता होती. मात्र पावसाने सभेवर पाणी फिरविले. आज मुंबईतील सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version