Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय “जितो स्विमिंग” स्पर्धेत रायसोनी पब्लिक स्कूल प्रथम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी जिल्हास्तरीय JITO इनक्युबेशन आणि इनोव्हेशन फाउंडेशन जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमाकाचे यश संपादन केले.

यावेळी ५० मी. फ्री स्टाईल प्रकारात आर्या नाहाटा हिला सुवर्ण पदक तर विधी ताटीया हिला रौप्य पदक तसेच धेर्य लोंढा या विध्यार्थ्याने कांस्य पदक मिळवत या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. यावेळी या स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या २० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण तसेच जलतरण प्रशिक्षक कमलेश नगरकर व ज्योत्स्ना पोद्दार यांचे या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version