Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मांडल्या महिलांच्या व्यथा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील रायसोनी मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार ८ मार्च रेाजी विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

 

यात स्त्री-भ्रूणहत्या, मुलगा व मुलीमध्ये घरात आणि समाजात होणार भेद, स्त्री अत्याचाराच्या घटना, महिलांची होणारी घुसमट आदींचे वास्तवरूपी चित्र पथनाट्याच्या माध्यमातून मांडले. कुटुंब आणि समाजात वावरताना महिलांनाच प्रत्येक ठिकाणी माघार घ्यावी लागते. मात्र, प्रत्येकवेळी महिलांनीच माघार का घ्यावी. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असून, त्यांची होणारी घुसमट दूर व्हावी. याच विषयाला अनुसरून विद्यार्थिनींनी ‘क्यो करे हम कॉम्परमाईज’ हे पथनाट्य सादर केले. विद्यार्थिनींनी सुरुवातीला महाविद्यालयाच्या परिसरात पथनाट्य सादर केले. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन  प्रा. डॉ. प्रणव चरखा उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणाच्या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट पथनाट्याचे प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले व महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचावा, व  मुलगा व मुलीमध्ये भेदभाव करू नका मुलींना सन्मानाने वागवा, महिलांचा आदर करण्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

पथनाट्यामध्ये मानसी जगताप, वैष्णवी महाजन, तोशिता नेहते, काजल तायडे, संजना पुराणिक, रोशनी वाणी, हर्षदा सपकाळे, जागृती ठोसरे, दर्शना राणे, निकिता राठोड, चेतना बाविस्कर, अविनाश जोशी, दर्शन जोशी, शहीद अहमद, तुषार सपकाळ, अजय सैंदाणे, सुर्यकांत कंधारे, सचिन चव्हाण, चेतन बडगुजर, प्रवीण वाल्मिक यांचा समावेश होता. आयोजनासाठी विद्युत विभागप्रमुख प्रा. बिपासा पात्रा, प्रा. मनीष महाले व मयुरी गजके यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version