निधी जमा केला, पण टिळकांनी छत्रपतींची समाधी बांधली नाही- आव्हाड

मनसेच्या औरंगाबादच्या सभेनंतर जितेंद्र आव्हाडांनी केली टीका

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी समिती स्थापन केली, निधी जमा केला परन्तु छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार केला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या औरंगाबादच्या सभेत शरद पवारांवरील टीकेनंतर राज ठाकरेंवर केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असून पवारांनी जातीजातीत द्वेष पसरविण्याचे काम केले. असे आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केले. यावर राज ठाकरे यांचे विचार केवळ सिल्वर ओक पर्यंतच सीमित आहेत कि काय? महाराष्ट्रात संत आहेत, स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक आहेत, कधीतरी चैत्यभूमीवर तरी जा, केवळ शरद पवार यांनाच टार्गेट करून जातीजातीत संघर्ष लावून तुम्हाला काय मिळणार? आज अनेकांना नोकऱ्या नाहीत बेरोजगारी, महागाईच्या समस्या आहेत, त्याच्याशी कधी बोलला नाहीत.
लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी पैसे जमा केले. पण जीर्णोद्धार केला नाही, १९२६ मध्ये ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराज जीर्णोद्धार समिती मार्फत जीर्णोद्धार केला, असे ऐतिहासिक कागदपत्रात आहे. परंतु केवळ द्वेषाच्या पोटीच शरद पवाराना टार्गेट करून टीका केली कि हेडलाईन मिळवली जाते, अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टिका केली आहे.

 

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!