Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायपूर येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रायपुर येथे २४ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मनोज राजेंद्र राजपूत (वय-२४) रा. बेटावद ता. जामनेर जि.जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, मनोज राजपूत हा आपल्या पत्नीसह जळगाव तालुक्यातील रायपूर येथील मराठी शाळेजवळ भाड्याच्या घरात वास्तव्याला होता. मनोज आणि त्याची पत्नी हे दोघे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होते. मंगळवारी ३१ मे रोजी सकाळी मनोज नाईट ड्यूटी करून घरी आला आणि पत्नीला दुचाकीने एमआयडीसीत कामाच्या ठिकाणी सोडले आणि घरी आला. त्यामुळे दुपारी मनोज घरी एकटाच होता. दरम्यान, त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मनोजची पत्नी घरी आली तेव्हा प्रकार लक्षात आला. शेजारच्यांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे.

Exit mobile version