Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चक्क रस्त्यावर अवतरले रेल्वे इंजिन ! (व्हिडीओ)

जळगाव वासिम खान । जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गावर आज चक्क रेल्वे इंजिन अवतरल्याने जाणारे-येणारे अक्षरश: हैराण झाले.

याबाबत वृत्तांत असा की, आज शहरातून एक अवजड वाहन चक्क रेल्वे इंजिनाला घेऊन जातांना दिसून आले. खरं तर, इंजिनासह रेल्वेच्या सर्व बाबींची वाहतूक ही फक्त रेल्वेनेच होत असते. मात्र हे रेल्वे इंजिन चक्क वाहनावरून जात असल्याचे पाहून बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. या इंजिनासाठी स्वतंत्र ट्रॉली तयार करण्यात आली होती. अतिशय संथ गतीने हे वाहन हायवेवरून जात असून याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

पहा– वाहनावरून जाणार्‍या इंजिनाचा हा व्हिडीओ.

Exit mobile version