Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेतून पडलेल्या परप्रांतीयाचा उपचारादरम्यान मृत्यू

west bengal

जळगाव प्रतिनिधी । जेवण घेवून धावत्या रेल्वेत चढतांना जखमी झालेल्या परप्रांतीय गंभीर जखमी झाला होता. सोमवारी उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत भूसावळ रेल्वे लोहमार्ग पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतकुमार राधिकारंजन दास (वय -52) रा. बॅन्डल ता.जि.हुगली, पश्चिम बंगाल हे खासगी जहाजाच्या कंपनीत चिफ कुक म्हणून कामाला आहे. सुट्टीत घरी आलेला असल्याने कल्याण येथे राहत असलेला पुतण्या विश्वजित दास याला भेटण्यासाठी एकटेच हावडा रेल्वेने 18 रोजी दुपारी बसले. दरम्यान 19 रोजी दुपारी 1.30 वाजता रेल्वे भुसावळ येथे थांबली. प्रशांतकुमार हे जेवण घेण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरले. जेवण घेतल्यानंतर रेल्वे सुरू झाल्याने घाईघाईत जेवन हातात धरून रेल्वेत चढत असतांना तोल जावून खाली पडल्याने एक पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीन भुसावळातील रेल्वे इस्पीतळात दाखल केले. रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या जवळ असलेल्या कागदपत्रांच्या आधारे लोहमार्ग पोलीसांनी कळवून घटनेची माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आले.

जळगावातच केले अंत्यसंस्कार
आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह पुतण्या व पत्नी यांच्या ताब्यात देण्यात आले. पश्चिम बंगाल येथील काही नागरीक शहरातील गोलाणी मार्केटमध्ये सोन्याचे दागीन्यांचे काम करणारे नागरीकांच्या मदतीने येथीलच नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबात भुसावळ लोहमार्ग पोलीसात आकस्कात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास रेल्वे कर्मचारी अमरजिंग डोंगर करीत आहे.

Exit mobile version