Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतप्त प्रवाशांचा धरणगाव स्थानकात “रेल रोको” आंदोलन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरक्षित तिकीट काढूनही चेन्नईहून अहमदाबाद येथे जाणार्‍या नवजीवन एक्सप्रेसमधील आरक्षीत डब्यात तिकिट असणार्‍या प्रवाशांना जागा न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले. यातच त्यांच्या वस्तूंची चोरी झाल्यामुळे एक्सप्रेस मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता  धरणगाव स्थानकात आली असता स्त्री-पुरूष प्रवाशांनी ‘रेल रोको’ करून रेल्वेचा निषेध केला.

याबाबत अधिक असे की, कर्नाटक मधून 50 ते 60 प्रवाशांचा एक ग्रुप हा नवजीवन एक्सप्रेस मधून प्रवास करत होता. रेल्वे आरक्षित तिकीट असतानाही गाडीत बसायलाही जागा नाही तसेच रेल्वे बुकिंग महिलांच्या दागिन्यांची चोरी झाल्याने संतप्त प्रवाशांनी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता  धरणगाव रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचली असता प्रवासी खाली उतरले व त्यांनी आक्रमक पवित्रा घेत. रेल्वे रुळावर बसले व नवजीवन एक्सप्रेस ही गाडी रोखून धरली.

धरणगाव रेल्वे स्थानकावर नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पोहोचली असता नवजीवन एक्सप्रेस मधून 50 ते 60 प्रवासी त्यातून खाली उतरले व जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही तसेच चोरी झालेल्या वस्तू आमच्या मिळत नाही तोपर्यंत रेल्वे गाडी पुढे जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा प्रवासी तसेच नागरिकांनी घेतला . रेल्वे इंजिनाच्या समोर रेल्वे रुळावर बसून रेल्वे स्थानकावर नवजीवन एक्सप्रेस रोखून धरला होता. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढल्यानंतर नवजीवन एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

Exit mobile version