Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाडळसा व न्हावी येथे गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील पाडळसा व न्हावी येथे गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावरती धाड टाकून दोन जणांवर कारवाई केली. 

त्यात अनुक्रमे पाडळसा येथे 31 हजार 500  व न्हावी येथे 1 हजार 50 रुपयेचे  हातभट्टीचे रसायन नष्ट करून हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त केले. या कारवाईत रविंद्र उर्फ चिनी महाराज भास्कर कोळी (रा पाडळसा) व न्हावी येथील पंकज चिंतामण तायडे या दोघांना अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय रोहिदास ठोंबरे सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे पोकॉ किरण चाटे हे को देविदास सूरदास विकास सोनवणे महेश वंजारी व उमेश सानप यांच्या पथकाने केली.

 

Exit mobile version