Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात बेकायदेशीर पान मसाला विक्री करणाऱ्यावर छापा

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात बेकायदेशीर सुगंधित पान मसाल्याची विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी छापा टाकून सुमारे ६६ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील सुगंधीत पान मसाला आणि गुटख्याची विक्री करण्यास सक्त मनाई असतांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात बेकायदेशील गुटखा व सुगंधीत पान मसाल्याची विक्री करणारा संशयित आरोपी आण्णा महारू पाटील (वय-३०) रा. शनीपेठ अमळनेर यांच्या घरावर सोमवारी दुपारी १ वाजता राहत्या घरावर छापा टाकून सुमारे ६६ हजार ४६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात पो.कॉ. रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहे. 

Exit mobile version