Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहूल शेवाळे यांना शिवसेनेचे गटनेते बनवा ! : शिंदे गटाचे पत्र

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहूल शेवाळे यांना शिवसेनेचे गटनेते बनवा असे पत्र एकनाथ शिंदे यांच्या गटाने ओम बिर्ला यांना दिले आहे. यावर आता लोकसभाध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालच शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचे संकेत दिले असून खासदारांचा हा गट आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यामागची पार्श्‍वभूमि स्पष्ट करणार आहे. यात ते पुन्हा एकदा थेट मातोश्रीवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. यातच आज सकाळी शिवसेनेतर्फे ओम बिर्ला यांना पत्र लिहून आपणच पक्ष असल्याचे नमूद केले आहे. या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील बिर्ला यांना पत्र लिहले आहे.

या पत्रात एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत १२ खासदार असून खरा शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर या गटाचे लोकसभेतील गटनेते म्हणून राहूल शेवाळे हे काम पाहणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता लोकसभा सभापती ओम बिर्ला हे दोन्ही बाजूंच्या अर्जावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version