Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहुल पाटील व मनोज माहेश्वरी यांच्या मनसेत प्रवेश

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल येथील आयटी अभियंता राहुल पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज माहेश्वरी यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

जळगाव येथे  महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पक्षाचे उपाध्यक्ष राकेश पेडणेकर ,जनहित कक्ष व विधी विभाग  नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू ,जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष  चेतन अढळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल  येथील आयटी इंजिनियर राहुल पाटील व सामाजिक कार्यकर्ते मनोज माहेश्वी यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमा ठिकाणी  जळगाव जिल्हाध्यक्ष अँड जमील  देशपांडे, जनहीत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक सय्यद, संदीप मांडोळे ,यावल येथील शहराध्यक्ष किशोर नन्नवरे,  श्याम पवार ,अजय तायडे, गौरव कोळी, अनिल सपकाळे ,गजेंद्र माळी, कुणाल बारी, रस्ते व आस्थापना चे जिल्हा संघटक राजेंद्र निकम व मुक्ताईनगर चे अतुल जवरे रावेर तालुका मुक्ताईनगर यावल चे असंख्य सर्व जनहित पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Exit mobile version