Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहुल गांधींच्या नागरिकत्वावर आक्षेप ; अर्जावर २२ एप्रिलला फैसला

rahul gandhi

 

अमेठी (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला आज (शनिवार) सकाळी सुरुवात झाली. यादरम्यान, राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार धृवलाल यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तक्रारदारांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत आक्षेप घेतला आहे. दरम्यान, याबाबत २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

 

तक्रारदारांनी म्हटले आहे की, २००४ मधील उमेदवारी अर्जात राहुल गांधींनी बॅक ऑफ्स लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. या कंपनीची कागदपत्रे ब्रिटनमध्ये सादर करण्यात आली होती. यात राहुल गांधी हे ब्रिटन नागरिक असल्याचे म्हटले होते. भारताचे नागरिकत्व नसल्यास निवडणूक लढवता येत नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Exit mobile version