Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

या भ्याडपणाची किंमत सरकारला मोजावी लागणार- राहूल गांधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीनबाबत भ्याडपणाची किंमत सरकारला मोजावी लागणार असल्याचा इशारा देत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी चीनबाबतच्या भारत सरकारच्या धोरणाबाबत आधीही जोरदार टीका केली आहे. यातच, त्यांनी आता पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे.

ममोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेलफ असं म्हणत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा मिळवलाय आणि भारत सरकार चेम्बरलेनसारखं वागत आहे. यामुळे चीन आणखी पुढे जाईल. भारताला मात्र मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत मोजावी लागेल. तसेच या ट्विटसोबत राहुल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजनाथ सिंह यांच्या लेह दौर्‍याचा आहे. भारत चीन दरम्यान चर्चेतून तोडगा काढणं कितपत शक्य आहे हे सांगता येणं कठीण आहे असं राजनाथ सिंह यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. यावरून राहूल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.

Exit mobile version