Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“राहुल गांधी (खान) चा तीव्र निषेध” : योगेश सोमण यांचा तिखट टोमणा

yogesh soman

मुंबई, वृत्तसंस्था | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता चहुबाजूंनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. प्रसिद्ध रंगकर्मी आणि सावरकरांचे खंदे समर्थक असलेल्या योगेश सोमण यांनी देखील या वादावर भाष्य केले आहे. “राहुल गांधी (खान) चा तीव्र निषेध” अशा शब्दांत त्यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

सोमण म्हणतात, “खऱंय राहुल भाऊ तू सावरकर नाहीस. कारण त्यांच्यात अन तुझ्यात काहीच नाही. ना त्याग, ना तेज, ना तर्क, ना तळमळ, ना तिखटपणा यातले काहीही नाही. पण खरंतरं मला वाटते तू गांधीही नाहीस. कारण त्यांच्यात आणि तुझ्यातही काहीही नाही. कसंय लग्नानंतर भारतीयांना पटेल असं एखादं आडनाव असावं म्हणून तुझ्या इंदिरा आज्जीला आणि फिरोज आब्बांना गांधीजींनी हे आडनाव दिलंय म्हणे. आधी तो इतिहास जाणून घे. सध्याची तुझी अवस्था म्हणजे आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यालेला अशी झाली आहे. पण तरीही तुझ्या आजच्या पप्पूगिरीचा मी जाहीर निषेध करतो. कारण सावरकर आडनाव घेण्याची सुद्धा तुझी लायकी नाही.”

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी शनिवारी भाष्य केले. “माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर घणाघात केला.

या विधानानंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले असून “एक-दोन नाही १०० जन्म घेतले तरीही राहुल गांधी यांना वीर सावरकर होता येणार नाही.” अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर टीका केली. तर दुसरीकडे सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत” असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version