Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयपीएल संघांवर भडकला राहुल द्रविड

Rahul Dravid

लखनऊ वृत्तसंस्था । राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या क्रिकेटची नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान लखनऊमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना आयपीएल संघांवर चांगलाच भडकला आहे. आयपीएल ही भारतीय स्पर्धा असून यात विदेशी प्रशिक्षकांवर जास्त भर दिला जात आहे. यावर द्रविडने नाराजी व्यक्त केली.

राहुल द्रविड हा लखनऊमध्ये १९ वर्षांखालील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका पाहण्यासाठी आला आहे. त्यावेळी त्यानं आयपीएलविषयी मत व्यक्त केलं. आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना फारशी संधी दिली जात नसल्याबद्दल माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक असलेल्या द्रविडनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडेही काही उत्तम प्रशिक्षक आहेत असे मला वाटते. त्यांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपले क्रिकेट आणि प्रशिक्षक प्रतिभासंपन्न आहेत. असे द्रविड म्हणाला. आपल्या प्रशिक्षकांचा आत्मविश्वास वाढवण्याची नितांत गरज आहे. आपल्या प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जात नाही याचे मला वाईट वाटतं, असेही तो यावेळी म्हणाला.

Exit mobile version