Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मास्टर कॉलनीत घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । मास्टर कॉलनी येथे अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करुन पर्दाफाश केला आहे. कारवाईत रिकामे सिलिंडर, गॅस भरण्याच्या मशीनसह ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) रा मास्टर कॉलनी व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) रा. सदाशिवनगर शेरा चौक  अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीत जळगाव किराणाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्याच्या म त्यानुसार चिंता यांनी जिल्हापेठचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक सलीम तडवी, रवींद्र मोतीराया , महेश महाले, समाधान पाटील यांच्या पथकाला  कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने बुधवारी १० नोव्हेंबर रोजी ८.३० वाजता मिळालेल्या माहीतीनुसार मास्टर्स कॉलनीत छापा टाकला. या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे घरगुती गॅस सिलिंडरमधुन इतर सिलेंडर वाहनांमध्ये गँस भरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) रा मास्टर कॉलनी व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) रा. सदाशिवनगर शेरा चौक या दोघांना ताब्यात घेतले आहे.

६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

या ठिकाणाहून पथकाने रोख रक्कम  १ हजार ९२० रुपये , ८ हजार ४८० रुपयांचे चार भरलेले सिलेंडर , २८ हजार ८०० रुपये किंमतीचे एकुण २४ रिकामे सिलेंडर , १ हजार २०० रुपयांचे १ इंडियन कंपनीचे रिकामे सिलेंडर, १  हजार २०० रुपयांचे १ एच पी कंपनीचे रिकामे सिलेंडर, १५ हजारांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा व   १२ हजारांचा गँस भरण्याचा पंप  असा एकूण  ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सपोनि महेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version