रबरी स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत निवेदन

धरणगाव प्रतिनिधी | आज धरणगाव शहर काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला रबरी स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

धरणगाव वरून जळगाव कडे जातांना कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल जवळ एकही स्पिड ब्रेकर नाही. या महाविद्यालयात ग्रामीण व शहरी भागातील विध्यार्थी तसेच शिक्षक कर्मचारी वर्ग व जिनींगचे कामगार पायी प्रवास करीत असतात. या महाविद्यालयाजवळ कुठल्याही प्रकारचे गती रोधक व फलक नाहीत. त्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची जास्त शक्यता आहे.या महाविद्यालय जवळ रबरी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत या मागणीसाठी धरणगाव शहर काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक खाटीक व वाघ यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळेस शहर अध्यक्ष राजू न्हायदे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकूर साहेब यांच्याशी दूरध्वनिवरून संपर्क साधला व त्यांच्याशी वरील विषयावर चर्चा केली. ठाकूर यांनी येत्या दोन दिवसात काम पूर्ण करतो असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष रातीलाल चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, महेश पवार, तालुका सरचिटणीस रामचंद्र माळी, नंदलाल महाजन, निलेश इंगळे, युवक कॉग्रेस उपाध्यक्ष राहुल मराठे, युवक काँग्रेस सरचिटणीस योगेश येवले व कार्यकते उपस्थित होते.

Protected Content