लघुसिंचनचे आर. के. नाईक यांना कार्यपद्धती भोवली ; कार्यमुक्तीची कारवाई (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 04 at 8.41.31 PM

जळगाव, प्रतिनिधी | लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांच्या कार्यपद्धतीवर जि. प. सदस्यांनी सर्वसाधारण सभेत नाराजी व्यक्त केली. आर. के. नाईक यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सभागृह चालू न देण्याचा पवित्रा सदस्यांनी घेतला होता. मात्र, प्रभारी सीईओ यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.

आज जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अनेकवेळा लघुसिंचनच्या आर.के.नाईकांवर कार्यमुक्तीचा ठराव झाला आहे. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. सर्वपक्षीय सदस्यांनी आर.के.नाईक यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा दिला. यावर प्रभारी सीईओ वान्मथी सी. यांनी सर्व प्रकरणांची माहिती घेऊन तातडीने आर.के.नाईक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे सदस्य रविंद्र पाटील यांनी आर.के.नाईक यांनी तब्बल २० कोटींच्या निधीचे परस्पर खर्च करण्याचे नियोजन केले. केंद्राच्या जलशक्ती योजनेवर जि.प.चा निधी खर्च केला. तसेच दोन वर्ष होऊनही बंधाऱ्यांची कामे केली नसल्याचा आरोप केला. त्यांनी कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना कार्यमुक्त करण्यात यावी अशी मागणी सभागृहात लाऊन धरली होती. नाईक यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिल्याने सभागृहात बराच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यात प्रभारी सीईओ यांनी हस्तक्षेप करून कारवाईचे आश्वासन दिले. प्रभारी अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड यांनी नाईक यांना पाच दिवसाच्या मुदतीत कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देण्यात असे सांगितले होते. मात्र प्रभारी सीईओ यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. सदस्यांच्या तक्रारीनंतर आर.के.नाईक यांना उत्तर देण्यासाठी समोर बोलविण्यात आले. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने सदस्य अधिकच संतप्त झालेत. जलशक्ती योजनेसाठी जि.प.च्या वळविलेला निधीचे नियोजन रद्द करून पुन्हा नव्याने नियोजन करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर नाईक यांनी सर्व कामे थांबविल्याचे सांगितले. दरम्यान, महिला सदस्यानी अजेंडा सभागृहातच दिला जात असल्याने विषयाचा अभ्यास करता येत नसल्याने रोष व्यक्त केला.

Protected Content