Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौकातील खड्डे बुजवा; भुसावळ नगरपरिषेदकडे मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुना सातारा चौकातील खड्‌डे तातडीने बुजविण्यात यावे अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांनी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज रस्ता काँक्रिटीकरण कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जामनेर रोडवरून जळगाव रोडवर येण्यासाठी जुना सातारा मुख्य चौकातून वाहतूक होत आहे. तसेच जळगावहून यावल, रावेरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. सर्व प्रकारची अवजड वाहनेसुद्धा याच चौकातून वाहतूक करीत आहे.

जुना सातारा मुख्य चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचून परिस्थिती आणखी बिघडणार असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा मजबुतीकरण करण्याची मागणी प्रा. धिरज पाटील यांनी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे.

 

Exit mobile version