Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प.वि.पाटील विद्यालयात ‘गुड टच बॅड टच’ वर मार्गदर्शन

20190904 153712

जळगाव प्रतिनिधी । अनेक लहान मुले व मुलींना वडीलधाऱ्या व्यक्तीकडून किंवा वयाने मोठ्या मुला मुलींकडून अयोग्य स्पर्शाचा अनुभव असतो. असे अनुभव मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करू शकतात. म्हणून अशा अयोग्य स्पर्शापासून त्यांचे संरक्षण व्हावे व त्यांना या विषयी अधिकची माहिती मिळावी या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमीत्त इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच बॅड टच’ या विषयाचा ‘नको तो ओंगळ स्पर्श ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी जळगाव उमवी च्या कौंसेलर डॉ.विना महाजन व गोदावरी मेडिकल कॉलेज च्या फिजिकल डायरेक्टर डॉ.मृणाल चित्ते यांचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले.

त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना अयोग्य स्पर्शापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, शरीराच्या कोणत्या भागाला इतरांचा स्पर्श चालणार नाही व कोणत्या भागाला चालेल हे समजून घेणे, विश्वसनीय व्यक्तीपाशी स्पष्टपणे सांगावे, कुणाला असा अनुभव आल्यास इतरांना त्याची कल्पना द्यावी, जर असा प्रसंग नेहमी होत असेल तर पोलिसांकडे तक्रार द्यावी, अशा प्रकारे विविध चित्रे, व्हिडीओ क्लिप तसेच प्रोजेक्टर च्या माध्यमातून समजावून सांगितले.

प्रसंगी केसीई सोसायटीच्या मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे, मुख्या.रेखा पाटील, उपशिक्षक नेमीचंद झोपे, अशोक चौधरी, स्वाती पाटील, योगेश भालेराव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version