Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुष्पाताई महाजन यांचा जळगाव तालुक्यात प्रचार दौरा

1e090e9f d2e9 49c4 addb 5d46d01fe692

 

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांनी रविवारी जळगाव तालुक्यात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी तरसोद, शिरसोली येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

जळगाव ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांनी जळगाव तालुक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी रविवारी जळगाव तालुक्यातील तरसोद व शिरसोली प्र.बो. येथे ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. तरसोद येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात जाऊन त्यांनी बाप्पाला विजयाचे साकडे घातले. यावेळी युवानेते विशाल देवकर, धरणगावचे माजी नगरध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक अध्यक्ष बापू परदेशी, सीमा नेहते, संतोष आंबटकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version