Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुर्णा नदीत तरूणाचा बुडून मृत्यू

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथील ३१ वर्षीय तरूणाचा पुर्णा नदीत उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पंकज शांताराम धायले (वय-३१) रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धायले हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खामखेडा शिवारातील पुर्णा नदीपात्रात पंकजने उडी घेतली. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही तरूणांच्या मदतीने तरूणाला पाण्याबाहेर काढून तातडीने मुक्ताईनगर शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version