Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कार्यकर्त्यांनी अंतर्गत कलह विसरून जोमाने कामाला लागा – पुरुषोत्तम पाटील

pachora kishora appa news

भडगाव प्रतिनिधी । अंतर्गत कलह विसरून भाजप पदाधिकारी कार्यकर्ते जोरात कामाला लागून किशोर पाटील यांना मोठा लीड देण्यासाठी अथक परिश्रम घेतील असा विश्वास भाजपचे तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम पाटील यांनी भाजपच्या बैठकीत उमेदवार किशोर पाटील यांना दिला. भडगाव येथे शिवसेना-भाजप युतीतील भाजप शक्ती केंद्र प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज दुपारी 3 वाजता पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे विधानसभा उमेदवार आमदार किशोर पाटील होते. तर व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष सी.जे.पाटील,  तालुका सरचिटणीस अनिल पाटील, डॉ. विशाल पाटील, सुरेश परदेशी, दगडू माळी, युवमोर्चा तालुका अध्यक्ष नितीन महाजन, (तांदुळवाडी), शहर अध्यक्ष शैलेश पाटील, युवमोर्चा शहर अध्यक्ष मुकेश महाजन, रवींद्र पाटील, शिवसेनेचे संजय पाटील, रावसाहेब पाटील, नगरसेवक सुनील देशमुख, दादाभाऊ पाटील, मच्छिंद्र शार्दूल, नंदू महाजन, विनोद नेरकर, बन्सी परदेशी यांच्यासह शहर व तालुक्यातील असंख्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुरवातीला भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मागील काळातील नाराजी व काही घटना व तक्रारी किशोर पाटील यांच्याजवळ मनसोक्त पने मांडल्या. त्यावर आगामी काळात विश्वासात घेऊन कामे करू, येथून पुढे स्थानिक सर्व निवडणूका युतीत लढू व गाव पातळीची कामे विश्वासात घेऊन करू असा शब्द पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिला. युवमोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील यांनी कार्यकर्त्यांनी सेनेच्या प्रचारात भाग घेऊन जोरात कामाला लागा अशा सूचना दिल्या . त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

भोर-पुनखेडा-पातोंडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पुर्ण
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २.२० कोटीसाठी आपण पाठपुरावा केला आहे. कोलवद येथे प्रचार फेरीमध्ये मोरगाव येथे जि.प.सदस्य रंजना ताई पाटील, प्रल्हाद पाटील, अशिक पिंजारी, सुधाकर पाटील, सुरेश धनके, पं.स.सभापती माधुरी नेमाडे, कृउबा समिती सदस्य गोपाळ नेमाडे, पवन चौधरी, अटवाडा येथे गणेश धनायते, सुनील महाजन, अशोक अग्रवाल, रमेश पाटील, भास्कर कुयटे, पांडूरंग कुयटे, पिंटू पाटील, लक्षणं बोरसे, पातोडी येथे मोहन बोरसे, लक्षणं सावळे, ब्रिजलाल सावळे, दौलत काचरे, भगीरथ कोळी, उमेश कोळी, वसंत ढाकणे, पूनखेडा येथे उमेश सवळे, आकाश सपकाळे, विनोद कोळी, सुभाष पाटील, मनोज पाटील, मनोहर सावळे, रमेश चौधरी, प्रकाश रायमले, गिरीष पाटील, नामदेव कोळी, गणेश पाचपोहे, भैया सावळे, प्रकाश चौधरी, निभोरा सिम येथे नंदकिशोर चौधरी, अनंत पाटील, लक्षण पाटील, रामकृष्ण महाजन, डॉ.भस्केर चौधरी, विकास पाटील, गोकुळ चौधरी, ताराचांद चौधरी, नारायण चौधरी, राघो चौधरी, कैलास पाटील, नगिनलाल सवरणे, विश्वनाथ सावरणे, सुभाष चौधरी, लक्षण पाटील, समाधान पाटील यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version