Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट; एक जखमी

Parli railway station blast

 

बीड वृत्तसंस्था । पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे परळी स्टेशनवर उभी असताना ही घटना आज (दि.23) घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये मोठी धावपळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सय्यद अक्रम (वय माहित नाही) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सय्यद अक्रम हा तरुण पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत त्याच्या कुटुंबासमवेत चढला होता. ही रेल्वे परळी रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी रेल्वेचे इंजिन बदलण्याचे काम सुरू असताना रेल्वे डब्यातील शौचालयात स्फोट झाल्याचा आवाज आला. काही प्रवाशांनी शौचालयाचा दरवाजा उघडला असता त्यात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. या स्फोटानंतर दहा मिनिटांनी रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमी तरुणाला रुग्णालयात हलविले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Exit mobile version