Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निव्वळ नौटंकीबाजपणा म्हणजे सुषमा अंधारे ! : राजीव भोर पाटलांची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडच्या काळात प्रचंड प्रकाशझोतात आलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्याने शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते राजीव भोर पाटील यांनी एक व्हिडीओ जारी करत सुषमा अंधारे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अंधारेंनी वाचाळपणाचा कळस केला आहे. सुषमा अंधारे काल मंत्री अब्दुल सत्तारांबद्दल काय बोलल्या? हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. अब्दुल सत्तार हे घरवालीचे तरी आहेत का? असा प्रश्न सुषमा अंधारेंनी सत्तारांना विचारला. मुस्लीम धर्माचं अनुकरणं कसं करावं? हे सुषमा अंधारेंनी अब्दुल सत्तारांना शिकवावं, हे वाईट आहे. खरं तर, धर्माबाबत कुणालाही शिकवण्याची सुषमा अंधारेंची लायकी नाही. ज्या बाईने स्वत:चा पत्नीधर्म, मातृधर्म नीट निभावलेला नाही, असं त्यांच्या विभक्त झालेल्या पतीने जाहीरपणे माध्यमांसमोर सांगितलं आहे. अशा बाईने इतरांना धर्म शिकवू नये असा सल्ला भोर यांनी दिला आहे.

भोर यांनी पुढे म्हटले आहे की, मागच्या बर्‍याच दिवसांपासून सुषमा अंधारे हिंदु देव-देवतांबद्दल वाटेल ते बरळत आहेत. वाटेल तसं भाष्य करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका नौंटंकीबाजपणा कुठल्याही बाईच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिला नाही. निव्वळ नौटंकीबाजपणा म्हणजे सुषमा अंधारे अशा शब्दांत राजीव पाटील भोर यांनी टीका केली आहे.

Exit mobile version