Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल येथील ९५ वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई

एरंडोल प्रतिनिधी । विज उपविभाग यंञणेतर्फे जवळपास दोन ते अडीच महीन्यांपासुन एरंडोल शहरासह तालुक्यात सर्वञ  विजचोरी प्रकरणी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, आज ९५ वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वीज मंडळाची ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ अशी अनेक वर्षांपासुन स्थिती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी विजचोरी व दर महिन्याला फुगणारे थकबाकीचे आकडे ही दोन मोठी आव्हाने उभी ठाकलेली आहेत. आतापर्यंत तालुक्यात मीटर मध्ये फेरफार करून विजचोरी करणारे ४३विज ग्राहक आढळुन आले असुन आकोडे टाकुन विजचोरी करणारे ५२ ग्राहक सापडले. या सर्व ९५ विज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विजचोरी करणार्यांचे धाबे दणाणले आहे. वीजचोरी धडक मोहीम राबविण्यासाठी एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, सहायक अभियंता प्रशांत महाजन, सहायक लेखापाल गोपाल चौधरी, ज्ञानेश्वर चव्हाण, रविंद्र चिंचोरे, भुषण मराठे, युनुस शेख आदींनी परिश्रम घेतले. या मोहीमेचे सर्वञ स्वागत करण्यात येत आहे.

 

Exit mobile version