Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६ जणांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर भुसावळ नगरपालिकेच्या पथकाने करवाई करत २६ जणांवर कारवाई केली. असून त्यांच्याकडून ११ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक दुकानचालकाने आरटीपीसीआर रिपोर्ट ठेवणे अनिवार्य केले आहे.  भुसावळ शहरात खरेदी करण्यासाठी अलोट गर्दी बाजारामध्ये फिरताना दिसत आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री करण्याची मुभा सरकारने सकाळी ७ ते ११ वाजेच्या दरम्यान घेण्यात आल्याने त्याचा फायदा भुसावळ शहरातील व्यापारी सकाळी ७ वाजेपासून चोरट्या मार्गाने आपले दुकाने उघडून तर त्यांना दुकानाच्या आत बसवुन शटर बंद करून विक्री करीत असल्याचे प्रकार पोलिस प्रशासनाच्या निर्देश आल्यानंतर ही व्यापारी न जुमानता सर्रास विक्री करताना दिसत आहे. भुसावळ शहरांमध्ये नगरपालिका व पोलिस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे बाजार गर्दी दिसत आहे. भुसावळ नगरपालिकेने दोन दुकानचालकावर आरटीपीसीआर नसल्याने प्रत्येकी ५०० रूपये दंड आकारला आहे. तर विना मास्क आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि नागरीक असे एकुण २६ जणांवर कारवाई करत ११ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.  

दंडात्मक कारवाई ऐवजी दुकाने सील करण्याची मागणी 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यात १५ मे पर्यंत घोषित करण्यात आला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, त्यानंतरही शहरात रस्त्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नगरपालिका व पोलिस प्रशासन दंडात्मक कारवाई करीत आहे तर दुसरीकडे दंड भरल्यानंतर हे व्यापारी आपली दुकाने चोरट्या मार्गाने सुरू ठेवून विक्री करून दुकानात गर्दी जमा करीत आहे. आता अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोडून प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन दुकानांना सील करण्याची कारवाई करण्याची मागणी भुसावळ शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version