Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मुक्तळ येथील तरुणांच्या हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या’ –  रा.ना.सोनवणे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रा.प.सदस्य शिवाजी गोकुळ पारधी यांची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने बोदवडचे तहसीलदार योगेश्वर टोंम्पे व बोदवडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले .

बोदवड येथील शासकिय विश्रामगृह येथे आदिवासी पारधी महासंघाचे महासचिव रा.ना.सोनवणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी “मुक्तळ येथील मयत शिवाजी पारधी यास राजकिय असुयापोटी महिलेने घरात रात्रीच्या वेळेस बोलाविले. त्याचे अपहरण करून घरातील सर्व सदस्यांनी अनैतिक संबंध असल्याचे भासवत बेदम मारहाण करून त्याची यांची हत्या केली. पुरावे नष्ट व्हावे यासाठी प्रेत हे बोदवड – मलकापूर  एका पुलाखाली फेकून देण्यात आले. त्यानंतर हा गुन्हा करण्यास पोलीसांनी टाळाटाळ केली. केवळ ९ आरोपींवरच गुन्हा दाखल केला व मोजकेच आरोपी अटकेत आहे .

मात्र या प्रकरणी काही आरोपी मात्र अद्यापही गुन्हा करून देखील मोकाटच आहे .तरी सर्व आरोपींचा पोलीस प्रशासनाने निपक्षपातीपणे शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी तथा सर्व आरोपींच्या विरोधात अॅट्रोसीटीचा गुन्हा नोंद करावा. पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपीच्या घराला संरक्षण आहे. मात्र पारधी वस्तींना का ? संरक्षण नाही. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाकडील तपास काढून इतर अधिकाऱ्यांकडून निपक्षपाती पध्दतीने तपास करावा” अशी मागणी केली.

या नंतर आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने बोदवडचे तहसीलदार योगेश्वर टोंम्पे व बोदवडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रल्हाद सोनवणे, विष्णू सोनवणे, तालुका अध्यक्ष समाधान पारधी, राज्य सचिव जितेंद्र पारधी, जिल्हा उपाध्यक्ष अरूण पारधी, ज्ञानेश्वर पारधी, मधुकर पारधी, सुरेश पारधी, नितीन पारधी, जयसिंग पारधी, आशाबाई पारधी, सोनाबाई पारधी, शारदाबाई पारधी, मंगलाबाई पारधी, कल्पना पारधी, रूख्माबाई  पारधी, रंजनाबाई पारधीसह मयत शिवाजी पारधी यांच्या घरातील सर्व सदस्य या पत्रकार परिषदेत उपस्थित होते .

Exit mobile version