Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी समाधान धनगर व उपाध्यक्षपदी मनोज चौधरी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची मीटिंग घेण्यात आली होती. सालाबाद प्रमाणे तिथीनुसार ९ मे रोजी सार्वजनिक शिवजयंती मोठा उत्सवात साजरी करण्यात येणार आहे व सायंकाळी सार्वजनिक शिव जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने कार्यकारणी जाहीर करण्यात आलेले आहे.

सालाबादप्रमाणे साजरी होणारी सार्वजनिक शिवजन्मोत्सवचे अध्यक्षपदी पारोळा तालुक्याचे बजरंग दलाचे गौरक्षक समाधान भाऊ धनगर यांची निवड करण्यात आली व गौरक्षक मनोजभाऊ चौधरी यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या दोघांच्या विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यांची सार्वजनिक शिवजयंती निमित्त मीटिंग घेण्यात आली होती. यावेळेस उपस्थित पंच व शहरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या एकमताने यांची निवड करण्यात आली आहे. विक्रम बापु पाटील, भानुदास कायस्थ कोळी, पुजु शेठ मराठे, विनोद‌ खाडे, नितीन बारी, मनिष अग्रवाल, लक्ष्मुण पैलवान‌, राजु गढरी, अक्षय भोई व शहरातील शिवप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version