महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या खा.जलील यांचा यावलमध्ये जाहीर निषेध

यावल प्रतिनिधी | “महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या ‘एमआयएम’ या पक्षाचे खासदार इम्तीयाज जलील यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.” या मागणीचे निवेदन अखिल भारतीय क्षेत्रीय महासभाच्या वतीने यावलचे तहसीदार महेश पवार यांना देण्यात आले आहे.

या संदर्भात अखिल भारतीय क्षेत्रिय महासभाने दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, “छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे वीर महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ पुतळयास जिल्हा नियोजन समितीच्या दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ अनुपालन अहवाल मुद्दा क्रमांक २८ मध्ये मंजूर झालेला निधी दुसऱ्या कार्यास लावावा असा पत्रव्यवहार खासदार इम्तीयाज जलील यांनी जिल्ह्याचे पालकमत्री यांना करत पुतळ्यास विरोध केला.

खासदार इम्तीयाज जलील यांनी केलेल्या वीर महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध केल्यामुळे देशाच्या संपूर्ण राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण करून आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्या लोकप्रतिनिधींचा समस्त राजपूत समाजाकडुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन ‘एमआयएम’ पक्षाचे औरंगाबाद ( संभाजी नगर ) चे खासदार इम्तीयाज जलील यांनी संपूर्ण समाजाची जाहीर माफी मागून आपले शब्द आणि स्मारक उभारणी संदर्भात विरोधात दिलेले पत्र मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्या विरूद्ध राजपुत समाज बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे जिल्हा संघटक निलेशसिंह पाटील, यावल तालुका अध्यक्ष तुषारसिंह परदेशी, युवा अध्यक्ष विशालसिंह पाटील, अखिल भारतीय क्षत्रिप महासभा महीला मोर्चा तालुकाध्यक्ष विद्याताई पाटील, उज्जैनसिंह राजपूत, कृष्णा पाटील, यशपाल सुनिलसिंह वर्मा, मंगलसिंह पाटील, ललीत परदेशी, निलेश परदेशी, प्रज्वल पाटील, जगदीश पाटील, ईश्वर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content