Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘एक गाव एक गणपती’ कार्यक्रमात लोकप्रबोधनातून जनजागृती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहीगाव येथे एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गावात लोकप्रबोधनाचे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील दहिगाव येथील सनातन एकता गणेश मंडळाच्या वतीने ‘एक गाव एक गणपती’ कार्यक्रमात विविध कार्यकामांचे आयोजन करण्यात आले. यात  हिंदू संस्कृती कशी जोपासली जाईल यासंदर्भात अनेक व्याख्यान दातांचे मार्गदर्शन लाभत आहे. यात सायली महाजन यांनी शिवचरित्र आणि आजची पिढी आणि उद्याची पिढी याबाबत मार्गदर्शन केले. सायली महाजन म्हणाली की, प्रत्येक घरात शिवाजी जन्मावा यासाठी घराघरात जिजाऊ असणे गरजेचे आहे जिजाऊ चे संस्कार प्रत्येक मातेने आपल्या मुला-मुलींना द्यावेत व व शिवाजी महाराजांसारखे मुलांना घडवावे असे आवाहन केले.

तसेच मातांनी मुलींना मोकळे शिक्षण द्यावं मात्र त्यांचे वर महिला सक्षम कशी होईल हे संस्कार घडवावे आणि प्रत्येक मुलगी ही स्वावलंबी व्हावी, असे संस्था करावेत आपण पूर्वी कसे होतो याचा विचार अंगी न बाळगता सध्याची परिस्थिती कशी आहे, यावर आधारित आपल्या मुलींना सुसंस्कृत करावे तर पालकांनी आपल्या पाल्यांना देखील तशी शिकवण द्यावी, कुटुंब एकत्रित पद्धत टिकवून ठेवावी व हिंदू संस्कृती कशी जोपासली जाईल हिंदू एकता कशी राहील याची दखल घ्यावी, असेही त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अजय पाटील सरांनी केले . कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश महाजन व त्यांच्या सर्वं सहकार्यानी व युवकांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version