मुक्ताईनगर पोलीसांतर्फे नागरीकांसाठी एकपात्री नाट्याद्वारे जनजागृती (व्हिडीओ)

मुक्ताईनगर पंकज कपले । मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्यावतीने नागरीकांमध्ये गुन्हेगारी व कायदेविषयक जनजागृती व्हावी यासाठी एकपात्री पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने, समाजसेवक सुमित पंडित यांच्या मुख्य अभियानातून पोलीस ठाणे मुक्ताईनगर हद्दीत आपल्या मुख्य अभिनयातून विविध गाण्यांतून जनतेस सावधान राहण्याचे आव्हान करण्यात आले या उपक्रमाला नागरीकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, कोरोना महामारीनंतर सर्वात मोठा सण दिवाळी हा साजरा केला. यासाठी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी एक संकल्पना आखली. त्यात नागरिकांना जनजागृती केली पाहिजे, विविध प्रयोगांतून नागरिकांना कसे सतर्क राहण्याचे आव्हान करता येईल, त्यासाठी सोमनाथ स्वभावने शहरातील प्रसिद्ध जूनियर चार्ली यांच्याशी संपर्क करून आपण जनतेला मुक्ताईनगर शहर हद्दीत जनजागृती चा जो कार्यक्रम घेतला. मुक्ताईनगर शहरात देखील आपल्या मूक अभिनय आतून एक वेगळा संदेश देऊया ! असा निर्धार केला आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना चोरी, मारामारी, चैन स्नँकींग, पॉकेटमारी दुचाकी चार चाकी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली.

 

सोमवार १५ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.  मुक्ताईनगर पोलीस ठाणे, तहसिल कार्यालयासमोर, प्रवर्तन  चौक,अंतुर्ली व कुर्हा गावातील समोर नागरिकांना जन जागृती करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सावधान दिवाळीच्या सणाला गावी जात आहात तर घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी राबवलेली आपला शेजारी,खरा पहारेकरी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातुन  नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला दिला.या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, गोपनीय कर्मचारी मनुरे, पोलीस कर्मचारी मंगल साळुंके, पोलीस अंमलदार अंकुश बाविस्कर, रवींद्र धनगर, अश्विनी बोडदे,

सकु तिगळवाड, सादिक पटवे, गजमल पाटील, रवी चौधरी, सुनिल नागरे, पत्रकार कमलाकर माळी व समस्त जागृत नागरिक मुक्ताईनगर शहर, अंतुर्ली, कुऱ्हा या गावी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साह मिळाला.

 

आपला शेजारी, खरा’ पहारेकरी – पो.नि. राहुल खताळ

सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अफवा सोशल मीडिया द्वारे पसरविन्यात येत आहे. तरी अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये कोणत्याही सोशल मीडिया तिला फोन वर भरोसा ठेवू नये मुक्ताईनगर शहरात घरफोड्या, दरोडे, दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जीपिआरएस शिष्टम किंवा लोखंडी साखळी,आपल्या गाड्याना बसवावे, रोकड,बॅंकेत ठेवा पैशांची आवश्यकता असल्यास शक्यतो आँनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्या,आपल्या मोबाइलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका,ऑनलाईन व्यवहार करताना स्वत ची खबरदारी स्वत च घ्या,सोसायटय़ा बंगले रो हाउस अशा ठिकाणी वॉचमन सुरक्षारक्षक नेमावे,सीसीटीव्ही बसवावेत, आपला शेजारी आपला खरा पहारेकरी असतो अशा शब्दांत त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांना जाऊन आवाहन केले.ज्युनिअर चार्लीने व माणुसकी समुहाने ज्या पथनाट्यातुन जनतेस आव्हान केले कि दक्ष नागरीकांनी घ्यावयाची काळजी त्याबद्दल त्याचे पोलीस प्रशासनातर्फे आभार मानतो.

पोलिस निरिक्षक राहुल खताळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन

Protected Content