Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथे पीएसआय कन्येचा नागरी सत्कार ( व्हिडीओ )

पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । अतिशय संघर्ष करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवून पीएसआयपदी नियुक्ती झालेल्या पहूर येथील लक्ष्मी सुरेश करंकार यांचा पहूर ग्रामपंचायत सभागृहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पहूर पोलीस ठाण्याचे दिलीप शिरसाठ हे होते . प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी पीएसआय कन्या लक्ष्मी करंकार यांच्यासह त्यांचे वडिल सुरेश करंकार, आई चंद्रकला करंकार तसेच भारतीय लष्करात निवड झालेले अमोल पांढरे, राहूल चौधरी व संदेश काळे यांचा पहूर कसबे ग्रामपंचायत, पहूर पे ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, विविध कार्यकारी सोसायटी , महात्मा गांधी तंटामुक्त गांव समिती, महात्मा फुले शिक्षण संस्था, आर .टी. लेले विदयालय, मिल्लत हायस्कूल, संतोषीमाता नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारतमाता पतसंस्था, कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, सप्तश्रृंगी पतसंस्था, जय मल्हार दुध उत्पादक संस्था , शहर पत्रकार संघटना, डॉक्टर्स असोशिएशन, क्षत्रीय माळी समाज संघटना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय, दिशा ज्येष्ठ नागरीक मंडळ, सुर्यकन्या एकता बहूउद्देशिय संस्था, सावित्रीबाई फुले विदयालय , डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय आदी संस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, प्रदीप लोढा, मधुकर पांढरे, आनंदा काळे, रामेश्‍वर पाटील , रमेश बनकर आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना पहूरची पीएसआय कन्या लक्ष्मी करंकार म्हणाल्या की, माझ्या आईवडिलांच्या कष्टाचे मी चीज केले. माझ्या सासरच्या मंडळीनेही माझ्या अभ्यासात मदत केली . त्यामुळे मी यश मिळवू शकले . गावाने केलेल्या सत्कारामुळे मी भारावले असून गावाच्या ऋणात राहणे मी पसंत करेल. या प्रसंगी पंचायत समिती सदस्या
पूजा भडांगे, सरपंच निता पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, उपसरपंच योगेश भडांगे , ग्रामपंचायत सदस्य विवेक जाधव, सुधाकर सुरडकर, ज्ञानदेव करवंदे, सुधाकर घोंगडे, आशा जाधव, शंकर घोंगडे, मधुकर पांढरे, दौलत घोलप, अर्जुन लहासे, मंगला पवार, बाबूराव पांढरे , अ‍ॅड .एस. आर . पाटील, गजानन सोनवणे, नागोराव जाधव यांच्यासह पदाधिकारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेंद्र सोनावणे यांनी केले. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. आभार वासुदेव घोंगडे यांनी मानले . यशस्वीतेसाठी सुनिल उभाळे, दिलीप पवार,प्रकाश घोंगडे, दिपक जाधव, ज्ञानेश्‍वर चौथे , नितीन लहासे,कडूबा बावस्कर आदींनी सहकार्य केले.

पहा : या सत्कार सोहळ्याचा व्हिडीओ.

Exit mobile version