Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दीपनगर येथे पोलिस उपनिरिक्षकाला धक्काबुक्की

भुसावळ प्रतिनिधी । रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या बल्कर वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलीस उपनिरिक्षकाला धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, दीपनगर येथील ५०० मेगावॅटच्या प्रकल्पाच्या गेटसमोर महामार्गावर राखेने युक्त असणारी बल्कर वाहने उभी राहत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. यामुळे या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तालुका पोलीस स्थानकाचे पथक आज दुपारी रवाना झाले होते. या पथकामध्ये तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि दीपक गंधाले, उपनिरिक्षक गजानन करेवाड, हेकॉ विठ्ठल फुसे, युनुस शेख, सुनील चौधरी, भाऊसाहेब पाटील, इस्तियाद सैयद, संदीप राजपूत व चालक सुनील शिंदे यांचा समावेश होता.

हे पथक दीपनगरच्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासमोरच्या गेटजवळ वाहनांची तपासणी करत होते. याप्रसंगी एमएच १९ सीवाय ३४३२ या क्रमांकाचे बल्कर आढळून आले. यावर कारवाई करण्याच्या तयारीत असतांना दोन जणांनी पोलीस उपनिरिक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की केली. यामुळे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमन जगविंदर सनसोये ( वय २६, रा. निंभोरा, ता. भुसावळ) आणि कुलदीप एकनाथ महाले ( रा. रेल्वे हॉस्पीटलच्या मागे, समतानगर भुसावळ ) या दोघांविरूध्द भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version