Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘कोरोना’ने मृत पावलेल्या पत्रकाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या (व्हिडिओ)

 

भुसावळ, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यात काही पत्रकारांनाही बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नेहमी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या पत्रकारांचे परिवार मात्र उघड्यावर आले आहेत.  कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पत्रकारांना बाधा झाल्यास मोफत उपचार करावा अशी मागणी भुसावळ शहर पत्रकार संस्थातर्फे  प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

सर्वत्र कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहा:कार उडाला असून अनेक जण आजारी आहेत. तर अनेकांना मृत्यु झालेला आहे. ‘पत्रकार’ हे समाजाच्या हिताचे काम करीत असतांना त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे लागते.  त्यामुळ कितीही काळजी घेतली तरी कोठेना कोठे त्यांना ‘कोरोना’ शी सामना करावा लागत आहे. मात्र तरीही न डगमगता ते आपल्या कर्तव्याशी इमान राखून जनसेवेचे हे कार्य दिवसरात्र करीत आहेत. अलिकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील बरेच पत्रकार ‘कोरोना’ मुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यात भुसावळच्या पत्रकारांच्या देखील समावेश आहे. भुसावळ येथील पत्रकार परशुराम बोंडे, विजय घोरपडे आदी पत्रकारांच्या समावेश आहे.

‘कोरोना’ मुळे पत्रकारांच्या झालेल्या मृत्यु व त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर पाहता त्यांचेवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. घरातील कमावती व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असतांना अचानकपणे निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे अशा मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना , वारसांना ५०  लाखाची आर्थिक मदत मिळणेची मागणी केली आहे. याप्रसंगी निवेदन देताना शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण, कायदेशीर सल्लागार अॅड. नितीन खरे, खजिनदार उजवला बागुल, संतोष शेलोडे, सचिव हबीब चव्हाण, निलेश फिरके, गोपी मेन्द्रे, कमलेश चौधरी, सतीश कांबळे, इम्तियाज शेख, कलीम पायलट, कालू शाह, राहूल वानखेडे, विनोद गोर्धे, सुनील आराक आदी पत्रकार उपस्थित होते.  निवेदनावर उपाध्यक्ष गणेश वाघ, आशिष पाटील, सहसचिव राजेश तायडे , ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी ,श्रीकांत सराफ, शाम गोविंदा, वासेफ पटेल, उदय जोशी, चेतन चौधरी, प्रफुल्ल नेवे, प्रशांत नेवे, इक्बाल खान ,राजेश पोतदार, राजू चौधरी, विवेक ओक, कैलास उपाध्याय, अभिजीत आढाव ,सद्दाम खाटीक ,अनिल सोनवणे, संजय काशिव, किशोर शिंपी ,सलाउद्दीन आदिब, दीपक चांदवानी, प्रकाश तायडे, शकील पटेल, प्रशांत अग्रवाल ,विकास चव्हाण, वसीम शेख, आकाश ढाके आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी ,प्रांत अधिकारीरामसिंग सुलाने ,तहसीलदार दीपक ढिवरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे यांना देण्यात आली आहे.

 

 

 

Exit mobile version