Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रियांका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात निदर्शने

पाचोरा, प्रतिनिधी ।  उत्तर प्रदेशातील लखीमपुर मधील शेतकर्‍यांना चिरडले गेलेल्याने त्यांच्या परिवाराला सांत्वन करण्यासाठी जात असलेल्या कॉंग्रेसच्या सदस्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ पाचोऱ्यात काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारे तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे, म्हणून उत्तर प्रदेश लखीमपुर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात केंद्रीय मंत्री च्या मुलाने चार शेतकर्‍यांना चिरडले यात शहीद झालेल्या शेतकरी परीवाराला सांत्वन भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी जात असतानांच त्यांना अटक करण्यात आली असून या भा.ज.पा. च्या योगी सरकार विरोधात पाचोरा कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शनात ”योगी तेरी ताना शाही नहीं चलेगी नहीं चलेगी” ”जो किसान से टकरायेगा वह मिट्टी में मिल जायेगा,” प्रियंकाजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, शेतकरी विरोधी काळे कायदे , रद्द झालेच पाहिजे” अशा अनेक घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणले होते.

यावेळी शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांच्या सह तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, नाना पाटील, शंकर सोनवणे, शंकर धमाले, अनिल धमाले, योगेश धमाले, संतोष पाटील, शंकर महाजन, आबा महाले, रवी ठाकुर, अनिल भोई, भुषण पाटील आदींनी जोरदार घोषणाबाजी करीत उपविभागीय अधिकारी कार्यालय गेले असता अव्वल कारकून रमेश मोरे यांना निवेदन देण्यात आले.

 

Exit mobile version