Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेट्रोल इंधन दरवाढीच्या निषेध; युवासेनेतर्फे सायकल रॅली (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पेट्रोल डिझेल भाववाढ संदर्भात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज युवासेनेच्यावतीने रविवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकापासून ते आकाशवणी चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेनेने इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

हेच का अच्छे दिन असा सवाल करत युवासेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी केला.

युवासेनेकडून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणा विरोधात निषेध नोंदवण्यासाठी गोलाणी मार्केटमधील शिवसेना कार्यालयापासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,  जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, शहराध्यक्ष शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, सरिता माळी-कोल्हे, नगरसेवक प्रशांत नाईक, प्रशांत सूरडकर, गजानन मालपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version