Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरियाणा राज्यातील मेवाड येथील हिंसाचार प्रकरणात विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे दोन निष्पाप कार्यकर्त्यांचे बळी गेले. अशा आतंकवादी वृत्तीच्या संशयितांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात आली.

 

हरीयाणा राज्यातील मेवाड येथील प्राचीन महादेव मंदीरात अधिक मास निमित्त आलेल्या भाविकांच्या गर्दीत काही लोकांनी अंधाधुंद गोळीबार, दगडफेक, पेट्रोल टाकून गाड्या व दुकाने जाळून टाकल्याच्या घटना घडली आहे. यात विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे दोन निष्पाप कार्यकर्त्यांचे बळी गेला आहे. तर काही शिवभक्त मोठ्या संख्येने जखमी झाले आहे. तरी आतंकवादी वृत्तीच्या लोकांना येथील पोलीस प्रशासनाने तातडीने शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, हिंसाचारात मयत झालेल्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी रूपयांची मदत देण्यात यावी, गंभीर जखमी झालेल्यांना २० लाख रूपयांची आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन गुरूवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

 

याप्रसंगी  विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, धनंजय तिवारी, महानगरमंत्री मनोज बाविस्कर, जिल्हा सहसंयोजक समाधान पाटील, भरत कोळी, हरीष कोल्हे, पवन झुंजारराव यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version